करमाळा तालुक्यातील हिवरे नागोबाचे गावात स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याठिकाणी अंधारात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यविधी उरकावे लागत आहेत. ही मृतदेहाची विटंबनाच असल्याचे सांगत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.