सोलापुरातील अण्णाभाऊ साठे चौक ते मरीआई चौकाला जोडणारा १०३ वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल आता पाडला जाणार आहे. क्षमतेअभावी १४ डिसेंबरपासून पाडकाम सुरू होईल आणि याच जागी ३५ कोटी खर्चून नवा पूल बांधला जाईल. सध्या या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद असून, ती वळवण्यात आली आहे. यामुळे शहरात मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता आहे.