सोलापूर : आषाढीचा पर्वकाळ सुरू झाला आहे. अशातच पंढरपूरच्या विठ्ठलास अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका एका भक्ताने अर्पण केल्या आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल 56 लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका विठ्ठलास अर्पण झाल्यात. त्यामुळे विठ्ठलाचे चरण आता सुवर्णजडित झाले आहे.