हरियाणातील सोनीपत येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आर्चरी ( तिरंदाजी ) निवड चाचणीत, करमाळा तालुक्यातील वरकुटे गावची कन्या वैष्णवी कुमार पाटील हिने आपल्या अचूक निशाण्याने देशाला अभिमान मिळवून दिला आहे. २६ ते २९ जून २०२६ या कालावधीत झालेल्या या चाचणीत तिने उत्कृष्ट प्रदर्शन करत थेट तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे.एशियन यूथ आर्चरी चॅम्पियनशिप, दुबई,KAA इनव्हिटेशनल स्पर्धा, कोरिया,एशिया कप २०२६ निवड झाली आहे.सातारा येथील 'दृष्टी आर्चरी अकॅडमी'मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या वैष्णवीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.