श्रावण महिन्यात करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे या गावातील तरूणाई गावातील नागनाथ मंदिरात मृदुंगाच्या तालावर वारकरी पाऊल खेळ खेळण्यात रमत आहेत. शंभरपेक्षा जास्त संख्येने दररोज येणाऱ्या या तरुणांना किर्तनकार विठ्ठल पाटील महाराज दोन तास भरपूर व्यायामाबरोबरच सामाजिक प्रबोधन आणि अध्यात्माचे धडे देत आहेत.