अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. अभिनेता सोनू सूद हे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. कोपरगाव येथील त्यांचे मित्र विनोद राक्षे यांच्या पत्नी सुरेखा राक्षे या नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत.