धाराशिव तालुक्यामध्ये गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्वारीचं पीक जमीनदोस्त झालं आहे. पावसाने मातीमोल झालेली ज्वारी आता शेतकऱ्यांना विकता येणार नाही, त्यामुळे काढणीचा खर्चसुद्धा निघणं कठीण झालं आहे. धाराशिव तालुक्यातील तडवळा गावामध्ये ज्वारीचं संपूर्ण पीक मातीमोल झालं आहे.