बीड जिल्ह्यात ऐन दिवाळीत नागरिकांना देण्यात आलेला तांदूळ आणि गहू अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. आळ्या, किडे आणि बुरशी चढलेला तांदूळ, गहू वाटप करण्यात आला होता. आणि आज पुन्हा माजलगाव तालुक्यातील रेशन दुकानांकडे पाठवण्यात आलेला गहू आणि ज्वारी सडलेली आणि बुरशी चढलेली दिसत आहे. दरवेळी धान्य पुरवठा विभागाकडून धान्य बदलून देऊ असे सांगितले जाते. मात्र दिवाळीत देखील धान्य बदलून देण्यात आले नाही आणि आजही तीच परिस्थिती दिसत आहे. यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष करू नये अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत तर लोकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय.