थलपती विजय आणि पत्नी संगीता यांच्या २७ वर्षांच्या वैवाहिक नात्याचा आता शेवट होत आहे. एकेकाळी आदर्श मानले जाणारे हे जोडपे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याची बातमी आहे. संगीताने विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत याचिका दाखल केल्याचे कळते. या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, विजयच्या राजकीय प्रवेशादरम्यान वैयक्तिक आयुष्यात आलेल्या या वादळाची चर्चा आहे.