वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात तेजी आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज सोयाबीला प्रतिक्विंटल ५ हजार रुपये असा दर मिळाल्याने हा मागील पाच ते सहा वर्षांतील उच्चांक मानला जात आहे. मागील वर्षभरापासून सोयाबीनचे दर चार ते साडेचार हजारावर स्थिर होते.