दीड महिन्यांपूर्वी वाशिम बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होत होती. त्यावेळी बिजवाई सोयाबीनला 8 हजार रुपयांच्या वर दर मिळत असल्याने दररोज 30 ते 35 हजार क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल होत होतं.