दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिलेले स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बारामतीचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने नगरसेविका संपदा चौधर यांच्या माध्यमातून रुई येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचा आज सलग दहावा शनिवार पार पडला.