डोंबिवलीकरांची आजची सकाळ अक्षरशः पुस्तकांच्या सुगंधाने दरवळली. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत, भारतातील एकमेव ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाचे डोंबिवलीत तिसऱ्यांदा भव्य आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजल्यापासूनच वाचनप्रेमींनी नेहरू रोड आणि फडके रोड परिसर गजबजून टाकला.