साताऱ्यातील फलटण इथल्या राव रामोशी पुलावर भरधाव वेगात आलेली कार कालव्यात पडली. अशातच रस्त्याने चाललेल्या एका व्यक्तीने गाडीतील दोघांना सुखरूप बाहेर काढलं. गोविंद दिलीप बोडरे असं जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. कार मधील दोघांचा जीव वाचवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.