‘हर घर तिरंगा अभियानातर्गत राहाता नगरपालिकेच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅली उत्साहात काढण्यात आली...हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.या रॅलीत शालेय विद्यार्थी , माजी सैनिक , सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.