बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गालगत चारचाकी स्विफ्ट गाडी लावून बुलढाणा जिल्ह्यातील निलेश शर्मा आणि त्यांचे मित्र थांबले होते. दरम्यान चोरटा गाडी जवळ आला त्याने स्प्रे मारला आणि गाडीतील लोक बेशुद्ध होताच त्यांच्या जवळील तीन महागडे मोबाईल लंपास केले. ही घटना आहेरवडगाव येथील एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी बीडच्या ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.