महाड दापोली राज्य मार्गावर पुन्हा एकदा लालपरी घसरून अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या मार्गावरील एका तीव्र उतारावरून ही बस घसरली आणि अपघात घडला. मुंबई-मंडणगड एसटी बस मंडणगडच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. रस्त्याचा मुख्य वळण आणि तीव्र उताराचा वाहन चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळते आहे. या अपघातामध्ये सुदैवाने जीवित हानी टळली आहे.