नांदेड जिल्ह्यातील मुखेड आगाराच्या एका एसटीबसमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुखेड ते अहमदपूर प्रवासादरम्यानचा व्हिडीओ असल्याचे म्हटले जात आहे.बसमध्ये पाणी गळत असल्याने एका प्रवाशाने चक्क बस चालकाच्या डोक्यावर छत्री धरली आहे. इतर प्रवाशांनीही स्वतःच्या डोक्यावर छत्र्या धरून पावसात प्रवास केल्याचे दिसत आहे. या घटनेने एसटी बसच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.