रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख एसटी आगाराच्या कारभारावर प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भर रस्त्यात बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांकडून धक्का देत सुरू करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे आगारातील बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.