आहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषदेचा भोंगा आता केवळ सूचना देण्यासाठी नाही, तर थेट मुलांच्या अभ्यासासाठी वाजणार आहे. मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन गेम्सच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी तसेच कुटूंबातील संवाद वाढवण्यासाठी राहुरी नगरपरिषदेने एक अनोखा आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. सायंकाळी सायरन वाजल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोबाईल , टिव्ही बंद करून अभ्यास करावा ही यामागची मुळ संकल्पना आहे.