राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये रंगपंचमीचा आनंद लुटला. शनी चौक परिसरातील पेशवेकालीन रहाडीत त्यांनी सूर मारत पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. यावेळी नाशिकमधील भाजपचे स्थानिक नेतेदेखील उपस्थित होते.