नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगावमध्ये आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यंदाही जोपासली जात आहे. छत्रपती शिवाजी मार्ग, कॅम्प विभागात दरवर्षीप्रमाणे यंदाही स्ट्रेंजर थिंग्स या लोकप्रिय वेब सिरीजवर आधारित तब्बल 25 फूट उंचीचा ‘ओल्ड मॅन’ साकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे, गवळी गल्ली युवक मंडळाने गेल्या 35 वर्षांपासून अखंडपणे आपली परंपरा जपत यंदा वायकिंग वेब सिरीजवर आधारित जवळपास 25 फूट उंचीचा ओल्ड मॅन उभारला आहे. जॉन्सन पेरीके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री ओल्ड मॅन जाळून नववर्षाचे स्वागत करण्याची अनोखी प्रथा येथे नेहमीप्रमाणे यंदाही पार पडणार आहे. बेळगावची ही परंपरा शहराच्या सांस्कृतिक ओळखीला वेगळीच झळाळी देणारी ठरत आहे.