साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवर कल्याणजवळ दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यात ट्रेनच्या C2 आणि C3 कोचच्या खिडकीची काच फुटली आहे. सुदैवाने घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. या प्रकरणात आरोपी सनी कांबळे (वय 22) याला ताब्यात घेतले असून कल्याण येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.