विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. चिखलदरा येथील स्ट्रॉबेरी गोड असल्यानं पर्यटकांची या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे, मात्र स्ट्रॉबेरीसाठी असलेलं अनुदान लवकरात लवकर सुरू करावं अशी विनंती या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.