जळगावच्या बोदवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे बसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत रस्त्यांवर गायी, बैल आणि इतर जनावरे ठाण मांडून बसल्याने वाहतूक खोळंबते. त्यातून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.