अंबरनाथमध्ये एका दिवसात भटक्या कूत्र्यांनी आठ नागरिकांचा घेतला चावा घेतला घेतल्याचे उघडकीस आले आहे. अंबरनाथ पश्चिमेतील बालाजी नगर परिसरात ही घटना घडली आहे. शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव चिंताजनक बनला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात काही शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. श्वानांचे निर्बीजीकरण आणि नियमित लसीकरणाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.