मागील काही दिवसांपासून परभणीच्या पूर्णा शहरात मोकाट श्वानांनी हैदोस घातला असून नागरिकांसह लहान मुलांना चावा घेतल्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. याकडे नगरपालिकेचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं आहे. मोकाट श्वानांची झुंडच मुख्य रस्त्यावरून फिरत असून नागरिकांना प्रचंड त्रास होतोय.