पूर्णा शहरात मोकाट गाढवांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकत्याच एका हल्ल्यात वृद्ध महिला जखमी झाली. या गंभीर घटनेनंतरही पूर्णा नगरपालिकेचे दुर्लक्ष कायम आहे. प्रशासन एखाद्याचा बळी गेल्यावरच जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.