भंडारा येथील आयुध निर्माणी परिसरात सुरक्षा भिंतीलगत असलेल्या पाणवठ्याजवळ पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाघ तब्बल दोन तास परिसरात थांबला होता. मागील आठवड्यातही या भागात वाघ दिसल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली होती.