मुक्ताईनगर जळगाव वाहनधारकांना झाले पुन्हा एकदा पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. मुक्ताईनगर ते कु-हा जाणाऱ्या रस्त्यावरील डोलारखेडा दरम्यान वनविभागातील पट्टेदार वाघाचे दर्शन वाहनधारकांना झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. याआधी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वाघाचे दर्शन झाले होते. वन्य प्राण्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.