जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जवळपास महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच शेतांची मशागत करून तयारी पूर्ण केली होती.