कोकणात सध्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर आता बळीराजा सुखावलाय. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळतोय. भात पेरणीला सध्या सुरुवात झाली असून पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती पद्धती कोकणात पाहायला मिळते. बैलजोडीच्या माध्यमातून सध्या नांगरणी सुरू असलेले चित्र पाहायला मिळत आहे.