अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होताच बळीराजाची खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गेले दोन दिवस चांदवड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.