मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. नाशिक पोलीस दलाच्या बॉम्बस्कॉड पथकाकडून मेटल डिटेक्टर आणि श्वानांकडून तपासणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील आठ ते दहा मंत्री उद्या कुंभमेळ्यांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत.