परळी शहरातील सिद्धेश्वर नगर येथील नर्मदेश्वर गुरुकुलम या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पेपर न दाखवल्याच्या कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली तसेच संस्थेतील साहित्याची तोडफोड करण्यात आली. या याप्रकरणी संभाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दोघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दखल होऊनही अद्यापही आरोपीना अटक न झाल्याने गुरुकुल येथील विद्यार्थी व वारकरी प्रेमी यांनी पोलीस स्टेशनवर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा काढला.