चाकण औद्योगिक परिसरातील वाकी गावाला जोडणारा मुख्य पूल अतिवृष्टीमुळे वाहून जाऊन तब्बल आठ दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही या पुलाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना चिखल, खड्डे आणि धोकादायक वाटेतून त्रासदायक प्रवास करावा लागत आहे.