जळगावच्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घालत अनेक समस्या मांडल्या. ग्रामीण भागातून येणाऱ्या बसेस महाविद्यालयाजवळ थांबत नाहीत, त्यामुळे पायपीट करत यावे लागते अनेकदा लेक्चर देखील बुडतात अशा समस्या विद्यार्थिनींनी मांडली. महाविद्यालयाजवळ सर्व बसेसला थांबा द्यावा, तशा आगारप्रमुखाना सूचना द्याव्यात अशी मागणी विद्यार्थिनींनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.यावेळी मंत्री गिरीश महाजन तसेच राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटल यांनी विद्यार्थिनींना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले .