पुणे जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत नासा संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी 16 हजार विद्यार्थ्यांमधून भोर तालुक्यातील दुर्गम भागातील आदिती पारठे आणि आदिती राऊत या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.. या दोन्ही आदितींनी शिक्षकांसह, भोरमधील शिवतीर्थ चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन नासा संस्थेला भेट देण्यासाठी अमेरिकेकडे रवाना झाल्या आहेत.