यवतमाळच्या पांढराकवडा इथल्या राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी शाळेचा मार्ग सुरक्षित करण्याच्या मागणीसाठी चक्क गावातील रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. आम्हाला अंडरपास बोगदा द्या, अन्यथा हे उड्डाणपूल नकोच.. अशी एकच ठाम मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.