परळी खोऱ्यात असणाऱ्या दुर्गम जगमीन गावातील ओढ्यावर विद्युत पोल वरून शालेय विद्यार्थ्यांनी प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हायरल व्हिडिओ बाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. या गावात तारळी नदीचे उगमस्थान असणाऱ्या ओढ्या पलीकडे विद्यार्थ्यांना कोणताही शाळेसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत नसून सोशल मीडियावर व्हायरल केलेला व्हिडिओ जाणीवपूर्वक बनवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश बुध्दे यांनी स्पष्ट केले आहे...