छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील जि.प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या निष्काळजीपणाविरोधात थेट बंड पुकारल्याची घटना समोर आली आहे. वेळेवर शाळेत न येणाऱ्या आणि तास न घेणाऱ्या शिक्षकाविरोधात संतापलेल्या विद्यार्थ्यांनी थेट शाळेच्या गेटला कुलूप लावलं आहे. या प्रकारानंतर पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेत जमा झाले आणि शिक्षक बदलण्याची मागणी केली.