नंदुरबार जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या हरित सेना उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील २४३ शाळांमधील विद्यार्थी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होत असून, याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तब्बल एक लाख सिड बॉलचे नंदुरबार कारागृह परिसरात रोपण करण्यात आले.