नाशिकच्या तपोवनात महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान, वेद पाठशाळा यांच्यातर्फे पर्यावरण आणि वृक्षांचं संरक्षण करण्यासाठी वेद पठण करण्यात आलं. वेद पठाण करण्यासाठी पाठशाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी वेद पठण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. गेल्या काही दिवसांपासून तपोवनमधल्या वृक्षतोडीविरोधात आंदोलनं सुरू आहेत.