शाळेचा पहिला दिवस म्हटलं की, आई-बाबांचा हात धरून रडत-खडत शाळेच्या पायऱ्या चढणारी मुलं... हे दरवर्षीचे ठरलेले चित्र... मात्र सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोली येथे आज या परंपरेला छेद देणारे एक अत्यंत उत्साही आणि अनोखे चित्र पाहायला मिळाले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवख्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाच्या वतीने अत्यंत जंगी स्वागत करण्यात आले.