जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाला आता आधुनिक संशोधनाची जोड मिळत आहे. शहरातील चंदु अण्णा नगर परिसरातील केळी संशोधन केंद्रात देशभरातील विविध राज्यांतील जवळपास 80 प्रकारच्या केळीच्या वाणांचा लागवडीतून अभ्यास करण्यात येत आहे. केळी संशोधन केंद्राच्या 25 एकर परिसरात संपूर्ण भारतातील केळीचे दर्शन घडत आहे.