गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा अंतर्गत येणाऱ्या मौजा बिबिटोला इथल्या शेतकरी गौरीशंकर रामचंद्र रहांगडाले यांच्या शेतात भात रोवणीचे काम सुरू असताना मजुरांना वन्यप्राणी बिबट मादीचे दोन लहान बछडे आढळून आले. बछडे दिसताच परिसरातील मुकेश बोपचेयांनी या घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे तात्काळ वनविभागाच्च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली.