नाशिक येथील कळवण धरण परिसरात शिवरात्र निमित्त यात्रा उत्सव व कुस्त्यांची दंगल सुरू असतानाच घटना घडल्याने नागरिकांमध्ये पळापळ झाली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र तीन मोटारसायकली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाविक व नागरिकांची पळापळ तर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विभाग प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना त्या बाबतीत काहीच माहिती नसल्याचे दूरध्वनीवरून सांगितले. वेळेवर खबरदारी न घेतल्यास मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा सुरु आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे.