सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमध्ये समानता नव्हती, तरीही मुख्यमंत्रीपदासाठी ते एकत्र आले. काँग्रेसची प्रत्येक कृती पक्षाला बोन्साय करण्याच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले. कधीतरी फार वर्षांपूर्वी काँग्रेस पक्ष होता असे म्हणण्याची वेळ येऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.