संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता असलेल्या ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत पार पडत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ आज वरळी डोममधून धडाडणार आहेत. या मेळाव्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. दोघे भाऊ एकत्र यावे, एकत्र राहावे, तसेच आवश्यकता असेल तर दोन्ही पक्षाचा एक पक्ष करावा, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.