सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांकडून सातत्याने येत असलेल्या फोनमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, कार्यकर्त्यांना काहीतरी सांगायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते अनेक जिल्ह्यांमध्ये दौरा आखणार आहेत.